रहाटणी मधील ATM फोडले, रक्कम लंपास

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहाटणी, शिवाजी चौकात असणारे आरबीएल बँकेचे एटीएम सेंटर गॅस कटरच्या सहाय्याने कापून चोरट्यानी रक्कम लंपास केली आहे. हा प्रकार आज बुधवारी सकाळी उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रहाटणी, शिवाजी चौकात, लिंक रोडवर आरबीएल बँकेचे एटीएम सेंटर आहे. हे एटीएम सेंटर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्यात आले आहे. यामध्ये किती रक्कम होती हे अद्याप स्पस्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आरबीएल बँकेचे अधिकारी आणि संबंधित व्यक्ती घटनास्थळी आल्या असून एटीएम सेंटर मध्ये किती रक्कम होती याचा हिशोब करण्याचे काम सुरु आहे. चोरट्यानी रात्रीच्या वेळी हा प्रकार केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही तपासात आहेत.