पिंपरी : एटीएम चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले, चिंबळी येथील एटीएम सेंटर फोडले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल्ययाच्या हद्दीत एटीएम मशीन फोडणाऱ्या चोरट्यानी पुन्हा डोकं वर काढलं आहे. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी येथे चोरट्यांनी एटीएम सेंटर फोडून रोकड लंपास केली आहे. हा प्रकार रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडला आहे.

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिमळी गावापासून 100 मीटर अंतरावर हिताची मनी स्पॉट एटीएम सेंटर आहे. या एटीएम सेंटरचा खालचा भाग गॅस कटरच्या सहाय्याने कट केला आहे. चोरट्यांनी या एटीएम सेंटर मधून रोकड लंपास केली आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नेहमी प्रमाणे सीसीटीव्ही फुटेज कुठे मिळते का याचा शोध घेत आहेत. या एटीएम सेंटर बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. एटीएम मशीनला असणाऱ्या कमेऱ्याला चोरट्यांनी स्प्रे मारला आहे. त्यामुळे त्यामध्ये स्पष्ट दिसत नाही.

गेली अनेक महिन्यांपासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एटीएम सेंटर फोडून चोरी करण्याचे प्रकार पूर्ण पणे थांबले होते. एकच आठवड्यापूर्वी नवीन आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारला आहे. तेंव्हा पासून पहिलाच एटीएम सेंटर फोडण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे चोरट्यानी डोकं वर काढल्याचे दिसत आहे. पोलीस चोरट्यांच्या मागावर आहेत.