Pimpri : WhatsApp ग्रुपवर बदनामी केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; कुटुंबावर हल्ला, 6 जण गंभीर जखमी

पिंपरी (Pimpari) : पोलीसनामा ऑनलाइन –  व्हॉटसअप ग्रुपवर (WhatsApp groups) दुसर्‍याचे स्टेटस ठेवणे, ग्रुपमधून काढणे किरकोळ बाबीवरुन सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर हाणामार्‍या होत असून काही वेळा खुनापर्यंत हे प्रकरण जाऊ लागले आहे.

चिंबळी गावातही त्यातून एका कुटुंबावर जमावाने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.

वडिल आणि चुलत्यांनी ग्रामपंचायतीला दान केलेल्या स्मशानभूमीच्या जागेत विहीर खोदण्याचे काम थांबविल्यावरुन चिंबळी गावकरी
या व्हॉटसअप ग्रुपवर (WhatsApp groups) बदनामी केल्याचा जाब विचारल्याने टोळक्याने तरुणासह त्याच्या घरातील ६ जणांना लोखंडी पाईप,
लाकडी दांडके,
हॉकी स्ट्रिकने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे.

आरोग्यासह सौंदर्याचीही विशेष काळजी घ्या

माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर महादेव बर्गे (वय ३५), चेतन तान्हाजी बर्गे (वय २३), सागर संभाजी बर्गे (वय २६), माऊली गोपाळ बर्गे (वय ३६),
अजय तान्हाजी बर्गे (वय २५), अमोल सुरेश बर्गे (वय ३०), सुरज हिरामण बर्गे (वय २४), प्रणव शंकर बर्गे (वय १९),
धिरज हिरामण बर्गे (वय २२, सर्व रा. चिंबळी ) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्या इतर ५ ते ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुमित अर्जुन जाधव (वय ३०, रा. बर्गे वस्ती रोड, जाधव वस्ती, चिंबळी) यांनी आळंदी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे वडिल व चुलते यांनी चिंगळी ग्रामपंचायतीला दान केलेल्या स्मशानभूमीच्या जागेत विहीर खोदण्याचे काम थांबविले होते.

व त्याची बदनामी आरोपी माऊली बर्गे याने चिंबळी गावकरी या व्हॉटसअप ग्रुपवर केली.

याचा जाब फिर्यादी याने विचारला होता.
त्याचा राग मनात धरुन २ जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सर्व
आरोपी हातात लोखंडी पाईप, लाकडी दांडके, हॉकीस्ट्रिक घेऊन जाधव वस्तीत आले.

त्यांनी फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ अभिजित अर्जुन जाधव, वहिनी, बहिण, चुलत भाऊ सचिन कालिदास जाधव, चुलत शांताराम तुकाम जाधव यांना सर्वांनी हाता पायावर, डोक्यावर, पाठीवर मारहाण केली.

अभिजित जाधव याला गंभीर जखमी करुन जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच वहिनीचा गळा दाबून त्यांचा विनयभंग केला.

पोलिसांनी ९ जणांना अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे अधिक तपास करीत आहेत