क्रिकेट खेळताना वाद, तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – महात्मा फुलेनगर चिंचवड येथे क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

अक्षय संजय इंगळे (25, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याने या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर विकास उर्फ पांग्या जाधव (20), वैभव कावळे (20, दोघे रा. शरद नगर, चिखली), आनंद उर्फ दादा गवळी (22, रा. ओटास्कीम) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास महात्मा फुले नगर चिंचवड येथील भारती सोसायटीसमोर असलेल्या रोडवर त्यांच्या मित्रासोबत बोलत थांबला होता. त्यावेळी आरोपींनी मागील काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणाच्या रागातून अक्षयला मारहाण केली. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले. तपास चिखली पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/