पिंपरी : गुन्ह्यात साक्ष देऊ नये म्हणून साक्षीदारावर खूनी हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये यासाठी आरोपींनी साक्षीदारावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी दहा वाजता चऱ्होली येथे घडला.

गोरख श्रीरंग पठारे (रा. चऱ्होली ) हा जखमी झाला असून त्याच्या आईने फिर्याद दिली आहे. राजू एकनाथ धनकडे (२५), राहुल एकनाथ धनकडे (२१, दोघे रा. चऱ्होली) आणि ओंकार लांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ; राजू आणि राहुल यांच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल असून तो न्यायप्रविष्ट आहे. या गुन्ह्यात गोरख हा साक्षीदार आहे.

या गुन्ह्यात न्यायालयात गोरख याने साक्ष देऊ नये यासाठी शुक्रवारी सकाळी राहते घरा समोर तिघांनी गोरख याच्यावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तपास दिघी पोलिस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/