रिपाइंच्या माजी तालुकाध्यक्षाचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगत रिपाइंचे ( आठवले गट ) मावळ तालुका माजी अध्यक्ष अमित छाजेड याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी (दि. 31) दुपारी घडला .

अमित माणिक छाजेड (रा. पोर्टर चाळ, देहूरोड) असे फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रिपाइंच्या माजी तालुका अध्यक्षाचे नाव आहे.

देहूरोड मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी अमित छाजेड यांनी उपोषण सुरू केले होते. हे उपोषण मागे घेण्यासाठी व्यापारी संघटनेकडून दोन लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी छाजेड यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 29) खंडणीचा गुन्हा दाखल झाला.

छाजेड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रिपाइंमधून त्याची तात्काळ हकालपट्टीही करण्यात आली. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तसेच देहूरोड पोलीसही आपले म्हणणे ऐकून घेत नाही. यामुळे त्याने सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात फिनेल पित आत्महत्येचा प्रयत्न केला.

पोलिसांनी छाजेड याला सुरवातील तालेरा आणि त्यानंतर पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. सध्या छाजेड यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे देहूरोड शहर, मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली.