पिंपरी : प्राधिकरणाच्या CEO पदी बन्सी गवळी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) मुंबई शहराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बन्सी गवळी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज (बुधवारी) पदभार स्वीकारला आहे.

भाजप सत्ताकाळात 6 सप्टेंबर 2018 रोजी सदाशिव खाडे यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत राज्यात सत्ता परिवर्तन झाले. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकासआघाडी सरकार आले. महाविकास आघाडी सरकारने खाडे यांना पदमुक्त करत पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडे ‘पीसीएनटीडीए’चा कारभार दिला होता.

त्यानंतर प्रमोद यादव यांची सीईओपदी वर्णी लागली होती. यादव 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांच्याकडे प्रभारी जबाबदारी होती. आता राज्य सरकारने मुंबई शहराचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बन्सी गवळी यांची प्राधिकरणाच्या ‘सीईओपदी’ नियुक्ती केली आहे. त्यांनी आज पदभार देखील स्वीकारला आहे.