पिंपरी : विनयभंग करून अल्पवयीन मुलींसह वडिलांना मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवयीन मुलीचा विनयंभग करून दोन मुलीसह तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. यात आरोपीने सिमेंटचा गट्टू डोक्यात घातल्याने वडिल जखमी झाले आहेत. मोशीतील बोराटेवस्तीमध्ये रविवारी (दि. 11) सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष रामचंद्र गालफाडे, प्रभू गालफाडे (दोघेही रा. बोराटे वस्ती, मोशी) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींचे नाव आहे. याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने रामचंद्र गालफाडे यांच्याकडून घर विकत घेतले आहे. त्यामुळे आरोपीनी फिर्यादींच्या 16 वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन केले. तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला, असे का केले असे फिर्यादीने विचारले असता, आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी त्यांना समजून सांगत असताना आरोपींनी रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्टू डोक्यात घातला फिर्यादीला जखमी केले.