पिंपरी : मोहननगर येथील संघवी कंपनीच्या आवारात भीषण आग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड, मोहननगर येथील संघवी या खासगी कंपनीच्या आवारात भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या आवारात संघवी कंपनी, ‘डिसी’चे गोदाम तसेच आणखी काही कंपनीचे प्लॅन्ट आहेत. आतमध्ये जाता येत नसल्याने नक्की कुठे आग लागली आहे हे नक्की सांगता येत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहननगर येथे संघवी कंपनी असून ती मागील काही दिवसांपासून बंद आहे. आज सायंकाळी सहाच्या सुमारास कंपनीच्या आवारात भीषण आग लागली आहे. आगीच्या ठिकाणी पोहोचता येत नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, परिसरातील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत.

कंपनीच्या बाजूला नाईट स्कूल, जैन स्थानक आणि रहिवासी सोसायट्या आहेत. संघवी कंपनीच्या कंपाउंडमध्ये आतल्या बाजूला हा आगीचा प्रकार घडला आहे. आगीची घटना घडल्यानंतर तात्काळ नाईट स्कूल सोडून देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like