पिंपरी भाजपाच्या महापौरांचा राज ठाकरेंच्या पायावर लोटांगण…

पिंपरी-चिंचवड : पाेलीसनामा ऑलनाईन

भाजपाच्या दुसऱ्या महापौर पदाचा बहुमान मिळालेल्या राहुल जाधव यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर लोटांगण घेत आशीर्वाद घेतला त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ते पिंपळे सौदागर येथील एका खाजगी जिम च्या उद्घाटनाप्रसंगी आले होते. यावेळी महापौर राहुल जाधव हे देखील उपस्थित होते. त्यावेळी हा अनोखा प्रसंग पाहायला मिळाला.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f022706d-9cc1-11e8-b291-ff663991e90f’]

रिक्षा चालक ते महापौर अशी ओळख पिंपरी-चिंचवडच्या महापौर राहुल जाधव यांची आहे. ते भाजपा मधून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना महेश लांडगे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांना पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर पदाचा बहुमान मिळाला. राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर राहुल जाधव यांनी पक्षात प्रवेश करत राजकारणातील श्रीगणेशा केला.

त्यांनी पक्षाचा विचार करत कठोर परिश्रम घेतले याचे फळ म्हणून २०१२ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी राहुल जाधव यांच्यावर विश्वास ठेवत तिकीट दिले आणि मनसे कडून बहुमताने निवडून देखील आले. त्यानंतर २०१७ मध्ये आमदार महेश लांडगे यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. त्यांना महापौर पद मिळाले,आज पुन्हा भाजपाचे महापौर असताना त्यांनी मनसे प्रेम दाखवत राज ठाकरे यांच्या पायावर लोटांगण घेतले त्यामुळे पिंपरी-चिंचवड च्या राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

You might also like