पिंपरीत गॅस गळती झाल्यानं स्फोट, 3 जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – भोसरी येथे सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने स्फोट होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली.

मनीषा साळुंखे (35), माऊली साळुंखे (40), सिद्धार्थ साळुंखे (13, सर्व रा. सिद्धेश्वर शाळेजवळ, भोसरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर शाळेजवळ साळुंखे कुटुंब एका इमारतीमध्ये खोलीत राहतात. रात्री मनीषा यांच्याकडून गॅस सिलेंडर सुरू राहिला. त्यामुळे गॅस गळती झाली. बुधवारी पहाटे उठल्यानंतर मनीषा यांनी गॅस सुरू करण्यासाठी लाईटरचा वापर केला. लाइटरने गॅस पेटवत असताना अचानक भडका होऊन स्फोट झाला. यामध्ये मनीषा साळुंखे आणि त्यांचे पती माऊली साळुंखे हे गंभीररीत्या भाजले व त्यांचा मुलगा सिद्धार्थ साळुंखे हा देखील जखमी झाला आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Visit : policenama.com