पिंपरी : भरदिवसा पिंपरी चौकात परराज्यातील व्यापार्‍याला लुटलं, पोलिस घटनास्थळी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – वर्दळी असणारा आणि शहरातील मुख्य चौक असणाऱ्या पिंपरी चौकात व्यापाऱ्याची दोन लाख ८० हजार रुपये असणारी बॅग हिसकावून नेली. ही घटना बुधवारी सकाळी आकरा वाजता घडली. रवी अमितचंद मेहता (७१, रा. आदनाला, जि. अमृतसर, पंजाब) या व्यापाऱ्याला लुबाडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहता हे सराफ व्यापारी आहेत.

ते काल पिंपरी येथील विक्रांत लॉज येथे मुक्कामी होते. आज सकाळी ते त्यांच्या ग्राहकांकडे पायी निघाले होते. चौकातील रत्ना हॉटेल समोर जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील पैश्याची आणि दागिन्यांची बॅग हिसकवली.

मेहता यांनी प्रतिकार केला, त्यावेळी चोरट्याने घातलेले हेल्मेट खाली पडले. मात्र दुचाकीवरुन आलेल्यानी  मेहता यांना हिसका देत पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक शंकर बाबर, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम तांगडे, गायकवाड यांच्यासह तपासी पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहीम सुरु आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. नेहमी हाकेच्या अंतरावर पोलीस असणाऱ्या चौकात भरदिवसा घटना घडल्याने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/