पिंपरी : व्यवसायासाठी 15 लाखाची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – व्यवसायासाठी घेतलेले 14 लाख 85 हजार रुपये परत न करता त्याचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 ते 13 नोव्हेंबर 2019 रोजी धावडेवस्ती भोसरी येथे घडली.

ज्ञानेश्वर वामनराव कोद्रे (वय 43, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आनंद पोपटलाल शिंगवी (वय 45, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या Herms I ticket (the smart shop) या मनी ट्रान्स्फर अ‍ॅपवरून आरोपी ज्ञानेश्वर याने व्यवसायासाठी 14 लाख 85 हजार रुपये विश्वासाने ट्रान्सफर करून घेतले. घेतलेले पैसे दुस-या दिवशी परत करणे अपेक्षित असताना पैसे परत न करता स्वतःकडेच ठेवून त्याचा अपहार केला. तसेच आरोपीने स्वतःचा मोबाईल फोन बंद करून कोणाला काहीही न सांगता निघून गेला. याबाबत विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.