पिंपरी : ATM कार्ड ‘क्लोनिंग’ करून फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – एटीएम कार्डचे क्लोनिंग करून महिलेच्या बँक खात्यावरून 20 हजार रुपये काढल्याचा प्रकार तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी जास्मिन जुबेर शेख (30, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 5) सकाळी शेख घरी काम करत असताना त्यांच्या मोबाईल फोनवर खात्यातून पाच हजार, त्यानंतर 10 हजार आणि काही वेळेनंतर आणखी पाच हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यामुळे शेख यांनी त्यांचे डेबिट कार्ड तपासले असता त्यांचे डेबिट कार्ड त्यांच्याकडे होते.

मात्र, अज्ञात आरोपीने त्यांच्या कार्डचे क्लोनिंग करून बँक खात्यातून 20 हजार रुपये काढून त्यांची आर्थिक फसवणूक केली. तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/