Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक, 20 लाखांचा गंडा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Cheating Fraud Case | एम.डी वैद्यकीय अभ्यासक्रमात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देतो (Lure Of Admission In Medical College), असे सांगून एका महिलेची 19 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडला आहे. या प्रकरणी तिन जणांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते 3 एप्रिल 2024 या कालावधीत रुपीनगर, तळवडे (Rupinagar Talwade) व डि. वाय. पाटील कॉलेज (DY Patil College) समोर घडला आहे. (Pimpri Cheating Fraud Case)

याबाबत एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल पवार, भास्कर राव, कुलभुषण कांबळे यांच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एम.डी साठी प्रवेश घ्यायचा होता. आरोपींनी संगनमत करुन भास्कर राव हे कॉलेजच्या मॅनेजमेंटमध्ये काम करत असल्याचे सांगितले.

फिर्यादी यांना डि.वाय पाटील कॉलेज पिंपरी येथे मॅनेजमेंट कोट्यातुन अॅडमिशन करुन देतो असे खोटे सांगितले.
अॅडमिशन करुन देण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 19 लाख 75 हजार रुपये घेतले.
यानंतर फिर्यादी यांनी अॅडमिशन बाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत काम लवकर होईल, असे सांगितले.
मात्र, प्रवेश न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तिघांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक