Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 318 नवे रुग्ण तर 8 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 4312 जण झाले बरे

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये रविवारी (दि.12) कोरोनामुळे संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या 7276 झाली आहे. यामध्ये 4312 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 39 रुग्ण पुणे आणि दुसऱ्या शहर, जिल्हे आणि तालुक्यातील आहे. त्यांच्यावर पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज शहरामध्ये कोरोनाचे 318 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. योगायोग म्हणजे तेवढ्याच रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 318 रुग्ण बरे झाले आहेत.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज ज्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पिंपरी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती, आकुर्डी येथील 68 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती, सांगवी येथील 57 वर्षीय व्यक्ती, चर्होली बु. येथील 61 वर्षीय ज्येष्ठ महिला, मारुंजी येथील 48 वर्षीय व्यक्ती, बीड येथील 95 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ती, देहूरोड येथील 46 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. आज पुणे आणि इतर जिल्ह्यातील 17 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. यांच्यासह एकूण बाहेरील जिल्ह्यातील 184 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आज दिवसभरात 318 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7276 झाली आहे. यामध्ये 146 रुग्णांचा मृत्यू झाला असून 107 रुग्ण शहरातील तर 39 रुग्ण शहराबाहेरील इतर जिल्ह्यातील आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आतापर्यंत 4312 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, शहरामध्ये 2465 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवड शहरातील 17 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.