Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात ‘कोरोना’चा प्रकोप ! बाधितांचा आकडा 5 हजारांच्या पुढं, 24 तासात 352 नवे पॉझिटिव्ह

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून परिस्थिची चिंताजनक होत चालली आहे. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 हजाराच्या वर गेली असून आज दिवसभरात 352 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5203 इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात शहरातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे आज 232 रुग्णांची कोरोनीची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळून आलेल्या 352 रुग्णांपैकी 342 रुग्ण शहरातील असून 10 रुग्ण शहराबाहेरील आहेत. यांच्यासह 116 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरु आहेत. शहरातील 13 रुग्णांवर पुण्यामध्ये उपचार सुरु आहे. आज एकाच दिवसात 5 जणांचा मृत्यू झाल्याने शहरातील मृतांची संख्या 72 झाली आहे. तर हद्दी बाहेरील 32 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनामुळे आतापर्यंत 104 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आज दिवसभरात 232 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 3138 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या शहरामध्ये 1968 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज मृत्यू झालेल्या 5 रुग्णांमध्ये पिपंरी, बौद्धनगर येतील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिखली शारदानगर येथील 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिंचवड येथील 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिपंरी सुखवाणी येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंपरी मिलिंदनगर येथील 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.