पिंपरी-चिंचवड बेशिस्त वाहतुकीचे शहर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहराचे गावपण आजून गेलेले दिसत नाही. शहरातील नेत्यांच्या कार्यकर्त्याच्या काळ्या फिल्ममिंग असणाऱ्या गाड्या चौकातही सुसाट असतात. त्यांना वाहतुकीचे नियम माहीतच नसतात यामुळे इतरही वाहन चालक वाहतुकीचे नियम मोडून वाहने तशीच रेमटवतात. यातच अकार्यक्षम वाहतूक पोलिसांची भर पडत होती. मात्र स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाले आणि आयुक्त म्हणून आर. के. पद्मनाभन यांनी पदभार स्विकारला. शहरातील वाहतूक समस्या गंभीर असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली अन शहरातील बेशिस्त वाहन चालकांचे सर्व प्रकार बाहेर आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’535a6bd9-be17-11e8-a750-bd4a1a05fb10′]

अवघ्या एक महिन्यात आयुक्ताल्याच्या हद्दीत २५ हजार चालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून या सर्वांकडून घरी जाऊन पोलीस दंड वसूल करणार आहेत. तर राँग साइडने जाणाऱ्या सुमारे ५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक १० हजार १९९ बेशिस्त वाहन चालक आढळून आले आहेत. तर ११४ जणांवर राँग साइडने गेल्याबाबत गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे वाहतूक नियम मोडाल तर पोलिस घरी येऊन दंड वसूल करणार हे निश्चित आहे.

[amazon_link asins=’B01MSYPGA9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6c06a4b5-be17-11e8-b286-471b8f214940′]

एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई होत असतानाच दुसरीकडे काही पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये पोलिस आयुक्तांच्या आदेशाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. आयुक्तालयातील १४ पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार हे खटले दाखल झाले आहेत, या सर्वांना कोर्टात हजर करण्यात आले. नो इंट्री, नो पार्किंग, मोबाइलवर बोलणे, सिग्नल तोडणे, डबल पार्किंग, ट्रीपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, हेल्मेट नसणे, फुटपाथ पार्किंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

चाकण विभागातील दिघी पोलिस ठाण्यात १४३६, आळंदी पोलिस ठाण्यात १०७६, चाकण पोलिस ठाण्यात १३६४ जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत; तसेच भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ९२६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

भुमीअभिलेख कार्य़ालयातील अधिकाऱ्याला कोऱ्या कागदाच्या रीमची लाच घेताना अटक

पोलिस ठाण्याबरोबरीनेच वाहतूक विभागाने देखील मोठी कारवाई केली आहे. पिंपरी वाहतूक विभागाने अडीच हजार जणांवर कारवाई केली आहे. निगडी वाहतूक विभागाने ४ हजार जणांवर कारवाई केली आहे, तर निगडी पोलिस ठाण्याने ११०५, देहूरोड पोलिस ठाण्याने ३७५ जणांवर कारवाई केली आहे. चिंचवड वाहतूक विभागाने राँग साइडने जाणाऱ्या १३ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना कोर्टात हजर केले. चिंचवड पोलिस ठाणे आणि चिंचवड वाहतूक विभागाने मिळून ५८२८ जणांवर कारवाई केली आहे.राँग साइडने वाहने चालविणाऱ्या चालकांवर पिंपरी पोलीस ठाण्यात ११४ गुन्हे, वाकड ठाण्यात ११०, हिंजवडीत ४५, सांगवीत १३, दिघीत ०५, आळंदीत११, तळेगाव दाभाडेत २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.