Pimpri Chinchwad Accident | पिंपरी चिंचवडमध्ये तीन अपघातांच्या घटना; तीन ठार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Accident | पिंपरी-चिंचवडमध्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महाळुंगे एमआयडीसी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यात तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pimpri Chinchwad Accident)

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळ असलेल्या एमआयडीसी ची कमान असलेल्या चौकात अज्ञात वाहनाची दुचाकीला धकड बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.25) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झाला. हनुमान तिरथ आय्यान (वय-20 रा. महाळुंगे, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सुनिलकुमार राजाराम आय्यर (वय-21 रा महाळुंगे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनोळखी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी सुनिलकुमार व त्यांचा भाचा मृत हनुमान हे दोघे दुचाकीवरुन अल्ट्राटेक कंपनी येथे जात होते. त्यावेळी एमआयडीसी कमान असलेल्या महाळुंगे चैकात चाकण बाजुने येणाऱ्या भरधाव वेगातील अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने, बेदरकारपणे चलवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये हनुमान आय्यन हा खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. यातच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला.

निघोजे येथे दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू

महाळुंगे : दुचाकीवरुन घरी जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीची धडक बसून एका युवकाचा मृत्यू झाला. हा अपघात निघोजे गावच्या हद्दीतील महाळुंगे ते तळवडे कडे जाणाऱ्या ब्रीजजवळ रविवारी (दि.25) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. गजानन पांडूरंग जाधव (वय-37 रा. मोरेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत संजय एकनाथ इंगळे (वय-52 रा. महादेव कॉलनी, मोई) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे. यावरुन अजय दादाभाऊ केदारी (वय-20 रा. ठाकर वस्ती, महाळुंगे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्य़ादी यांच्या साडुचा मुलगा गजानन त्याच्या दुचाकीवरुन मोरेवस्ती येथे महाळुंगे ते तळवडे रोडने घरी जात होता. गजानन सायंकाळी चारच्या सुमारास ब्रीज जवळ आले असता आरोपी पाठिमागून स्प्लेंडर दुचाकीवरुन भरधाव वेगात आला. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गजानन यांच्या दुचाकीला जोरात धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी होऊन गजानन जाधव यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

रस्ता ओलांडताना ट्रॅव्हल्सची धडक

भोसरी : रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसची धडक बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
हा अपघात भोसरी येथील लांडेवाडी झोपडपट्टी समोर शनिवारी (दि.24) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास झाला.
याबाबत अर्जुन रामभाऊ गव्हाणे (वय-39 रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात
फिर्य़ाद दिली आहे. यावरुन तुकाराम लिंबाजी यमगर (वय-31 रा. वडगाव दादाहरी ता. परळी वैजनाथ, जि. बीड)
याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

फिर्यादी अर्जुन गव्हाणे यांचा 43 वर्षीय भाऊ लांडेवाडी झोपडपट्टी समोरील रस्ता ओलांडत होते.
त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील बस हयगयीने व निष्काळजीपणे चालवून, वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करुन
फिर्यादी यांच्या भावाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन फिर्यादी यांच्या भावाचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी पळून गेला होता. पोलिसांनी तपास करुन आरोपी चालकाला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | घराची वाट चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियांची भेट

पुणे : जुन्या वादातून अल्पवयीन मुलाला धारदार हत्याराने मारहाण, चार जणांवर FIR

Pune Murder Suicide Case | पुणे : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या; खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या ‘पिकॉक बे’ परिसरातील घटना

जेवण वाढताना पती-पत्नीमध्ये वाद, पत्नीकडून पतीवर चाकूने वार; भवानी पेठेतील घटना

Pune Pashan-Sus Road Accident | पाषाण-सूस रोडवर अपघात, संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू