चाकण मध्येही एटीएम फोडण्याचा प्रयत्न; वाकड मधील एटीएम मधून १३ लाख लंपास

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चाकण, म्हाळुंगे येथील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम सेंटर फोडून रक्कम चोरण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. तर वाकडमधील रहाटणी परिसरात गॅस कटरने फोडलेल्या एटीएम सेंटर मधून १३ लाख रुपये लंपास केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री दोनच्या सुमारास हे कृत्य केले असून ते फरार आहेत.
atm
दोन आठवड्यांपूर्वी वाकड परिसरातच अज्ञात आरोपींनी गॅस कटरने एटीएम कापलं खरं, मात्र त्यातील आठ लाख रुपये या घटनेत जळून खाक झाले होते. त्यानंतर, आज रहाटणी परिसरात तीन अज्ञात आरोपींनी आरबीएल बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून १३ लाख रुपये घेऊन पोबारा केला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

म्हाळुंगे येथील एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र चोरट्यांना पैसे चोरुन नेता आले नाहीत. यापूर्वी म्हाळुंगे येथे एटीएम सेंटर मशीनसह चोरट्यांनी पळवून नेले आहे. त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही.

You might also like