Pimpri Chinchwad Bandh | महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात गुरुवारी पिंपरी-चिंचवड बंद, छत्रपती संभाजीराजे होणार सहभागी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Bandh | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsinh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यावरुन राज्यात राजकीय वादंग पेटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह बहुजन समाजाच्या महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी उद्या (गुरुवार दि.8) पिंपरी-चिंचवड शहर बंदचे (Pimpri Chinchwad Bandh) आवाहन केले आहे. पिंपरी चिंचवड बंदमध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) सहभागी होणार आहेत.

 

महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात विविध राजकीय पक्ष व संघटना यांनी उद्या पिंपरी चिंचवड बंदची (Pimpri Chinchwad Bandh) हाक दिली आहे. या बंदमध्ये संभाजीराजे दुपारी 12 वाजता पिंपरी येथे सहभागी होणार असल्याची माहिती बहुजन महापुरुष समितीच्या समन्वयक यांनी दिली आहे.

 

गुरुवारी सकाळी 7 ते 5 पर्य़ंत शहर बंदचे आवाहन करण्यात आले असून शहरातील सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे,
असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत पिंपरी चौकात धरणे आंदोलन केले जाणार आहे.
तसेच शहरातील विविध संस्थांचे कार्यकर्ते रॅलीद्वारे याठिकाणी जमणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- Pimpri Chinchwad Bandh | chhatrapati sambhaji raje participation in tomorrow shutdown in pimpri chinchwad pune print news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | धक्कादायक! बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्यातच घेतले पेटवून; पिंपरी चिंचवडमधील घटना

Sanjay Raut | ‘काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले, गुजरात भाजपकडे’ – संजय राऊत

Congress Leader Nana Patole | “भाजप सर्वकाही उद्योगपतींसाठी करत आहे”; धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला, नाना पटोले यांची टीका