पिंपरी चिंचवडच्या भाजप महिला पदाधिकाऱ्याचा तालुका अध्यक्षाकडून विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या भोर-वेल्हा तालुका अध्यक्ष आनंद देशमाने याने पिंपरी चिंचवड भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला अश्लिल व्हिडीओ पाठवून विनयभंग केला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आनंद देशमाने विरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादेनुसार, आनंद देशमाने हे वेल्हा तालुकाचे भाजपा तालुका अध्यक्ष असून पीडित महिलेची ओळख तीन वर्षांपूर्वी एका सामाजीक कार्यक्रमामध्ये झाली होती. त्यावेळी देशमाने याने पीडित महिलेचा मोबाईल नंबर घेतला होता. दोन आठवड्यापासून आनंद देशमाने हा महिलेच्या व्हॉटस्अॅपवर मेसेज पाठवत आहे. त्यावेळी त्याला मेसेज पाठवण्यास मनाई केली होती. तरी देखील तो मेसेज पाठवत होता.

आनंद देशमाने याने रविवारी (दि.२८) रात्री दहाच्या सुमारास मेसज करुन व्हिडीओ आवडला का, तसेच पती घरी आहेत का अशी विचारणा केली. त्यावेळी पीडित महिलेने पती घरी नसल्याचे सांगितले. त्यानंतर आनंद देशमाने याने महिलेला अश्लिल व्हिडीओ पाठवून विनयभंग केला.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादेवरुन भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आनंद देशमाने विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.