महापौर राहुल जाधव यांची वह्या-पुस्तकांनी तुला…

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवडचे महापौर हे कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धी झोतात असतात.राहुल जाधव यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर पदाचा पदभार स्विकारल्यापासून ते प्रकाश झोतात आलेले आहेत.आता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हारल होत असून त्यात महापौर राहुल जाधव यांची वह्या पुस्तकांसोबत तुला होत असल्याच पाहायला मिळत आहे.हा फोटो मोशीच्या वुडस व्हीला येथील सीसायटीमधील असल्याचे खुद्द महापौर राहुल जाधव यांनी सांगितले आहे.महापौर झाल्याने सोसायटीतील व्यक्तींनी वह्या पुस्तक तुला ठेवण्यात आली असल्याच त्यांनी सांगितलं,या वह्या पुस्तक आळंदी येथील गरीब आणि होतकरू विद्यार्थाना देण्यात आल्या त्यामुळे महापौर यांचं कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

महापौर पदाच्या निवडणुकीच्या दिवशी त्यानी महात्मा फुले यांच्या वेशात पालिकेत प्रवेश केला होता, त्यांच्या नावावर महापौर पदाचा शिक्का मोर्तब झाल्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करत भंडारा उधळला गेला होता, त्यानंतर आलेल्या पावसामुळे त्याचा चिखल झाला आणि नागरिक दुचाकी वरून घसरू पडले त्यामुळे त्यांना हात जोडून दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली होती.
[amazon_link asins=’B071JWBFDT,B06XFLY878′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20609912-a17f-11e8-84f3-addfd7877e53′]

तर मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या पायावर लोटांगण घातल्या प्रकरणी देखील महापौर राहुल जाधव यांना समिश्र प्रतिक्रियाना तोंड द्यावे लागले होते.मात्र पुस्तक आणि वह्या तुलामुळे त्यांची ही ओळख पुसटशी व्हायला मदत होत आहे हे नक्की.पुस्तक आणि वह्या तुलावेळी आमदार महेश लांडगे,कामगार नेते मारूतीशेठ जांभुळकर,भाऊराव पांडे,डॉक्टर प्रमोद कुबडे,अजित वाडकर,संदीप उमक,प्रशांत नायर,मिलिंद जोशी,विशाल कोरशेट्टी, महिंद्रा सोक्की,सचिन पेटकर,संदीप कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.