Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 798 नवे पॉझिटिव्ह, 16 जणांचा मृत्यू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात 301 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरामध्ये आज दिवसभरात 798 रुग्णांची कोरोनाची चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज दिवसभरात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 521 वर पोहचली आहे.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 798 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 25 हजार 106 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले 798 रुग्णांपैकी 795 हे शहरातील आहेत. तर 3 रुग्ण शहारा बाहेरील असून शहराबाहेरील 319 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 50 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 16 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 15 रुग्ण शहरातील आहेत तर 1 रुग्ण शहराबाहेरील आहे. शहरातील मृतांचा आकडा 521 वर पोहचला आहे. यामध्ये 423 रुग्ण शहरातील तर 98 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 301रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 17 हजार 407 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 3970 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये पुनावळे, दापोडी, भोसरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, मोशी, सांगवी, निगडी, पिंपरी, आकुर्डी, किवळे, चाकण येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.