Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2830 नवीन रुग्ण, 53 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिकच घातक ठरताना दिसत आहे. पुण्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली असताना देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. राज्यात रुग्ण वाढ होत असल्याने राज्य सरकार निर्बंध आणखी कडक करण्याच्या विचारात आहे. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड शहरात देखील चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 2830 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 2318 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड माहानगरपालिका वैद्यकिय विभागाने दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवार) दिवसभरात शहरात 2830 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 83 हजार 746 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2318 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 58 हजार 684 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 22 हजार 682 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 53 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 31 रुग्ण शहरातील आहेत. तर 22 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3404 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2380 तर हद्दीबाहेरील 1024 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण मोशी, सांगवी, भोसरी, घरकूल, काळेवाडी फाटा, पिंपरी, अकुर्डी, चिखली, चिंचवड, संत तुकाराम नगर, कासारवाडी, तळवडे, वाकड, थेरगाव, पुनावळे, पिंपळे गुरव, रहाटणी, दिघी, पुणे, वडगाव शेरी, धानोरी, बाणेर, दौंड, मुंढवा, जुन्नर, सिंहगड रोड, चिंचोली, अंबेगाव, थेऊर, चाकण, कोथरुड, हिंजवडी, कात्रज, हापडसर, वारजे, मरकळ, खडकी येथील रहिवाशी आहेत.