Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2279 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरामध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच लसीकरण देखील वाढवण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांच्या संख्येत देखील वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 2279 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2279 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 86 हजार 025 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1980 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्य़ंत 1 लाख 60 हजार 664 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 22 हजार 949 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 54 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 32 रुग्ण शहरातील आहेत. तर 22 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3458 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2412 तर हद्दीबाहेरील 1046 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण चिखली, पिंपळे गुरव, बोपखेल, वाकड, रहाटणी, निगडी, दिघी, मोशी, आकुर्डी, कासारवाडी, संत तुकारामनगर, पिंपळे निलख, चिंचवड, पिंपळे सौदागर, थेरगाव, निगडी, दापोडी, मोरवाडी, रुपीनगर, रावेत, खेड, खडकी, पुणे, अंमबोली, सिंहगड रोड, धायरी, वडगाव शेरी, चाकण, बावधन, हडपसर, बोपोडी, मुळशी, नाशिक, अहमदनगर, बाणेर, वारजे, विश्रांतवाडी येथील रहिवाशी आहेत.