Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2385 नवीन रुग्ण, 2376 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात देखील मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2385 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 2376 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरापालिका वैद्यकीय विभागाने दिली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2385 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 90 हजार 973 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2376 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 65 हजार 246 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 23 हजार 251 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहराबाहेरील 2385 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 211 जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 55 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 32 रुग्ण शहरातील आहेत. तर 23 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3567 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2476 तर हद्दीबाहेरील 1091 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण चिंचवड, मोशी चऱ्होली, चिखली, सांगवी, मोरवाडी, वाकड, काळेवाडी, ताथवडे, भोसरी, रहाटणी, दिघी, तळवडे, नेहरुनगर, पिंपळे गुरव, निगडी, पिंपळे सौदागर, रावेत, बाणेर, आळंदी, पुणे, शिरुर, देहुगाव, विश्रांतवाडी, वारजे, चंदननगर, जुन्नर, मंचर, धानोरी, रांजणगाव, शिक्रापूर, बालेवाडी, खडकवासला, बोपोडी, पर्वतीगाव, खेड येथील रहिवासी आहेत.