Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2539 नवीन रुग्ण, 2156 जणांनी डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आह. गेल्या 24 तासात शहरामध्ये 2539 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 54 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2539 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 93 हजार 512 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2156 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 67 हजार 402 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 23 हजार 602 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 54 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 32 रुग्ण शहरातील आहेत. तर 22 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3621 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 2508 तर हद्दीबाहेरील 1113 रुग्णांचा समावेश आहे.

आज मृत्यू झालेले रुग्ण मोशी, पिंपळे सौदागर, चऱ्होली, काळेवाडी, निगडी, रहाटणी, पिंपरी, चिखली, किवळे, पिंपळे निलख, चिंचवड, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरव, निगडी, अकुर्डी, भोसरी, थेरगाव, पिंपरी, रावेत, मोरवाडी, पिंपळे सौदागर, सांगवी, गोरखपूर, हिंजवडी, खेड, कोथरुड, औंध, खडकी, येरवडा, आळंदी, शिरुर, चाकण, वडगाव शेरी, तळेगाव येथील रहिवाशी आहेत. पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आधी मृत झालेल्या केसेस आज कळवण्यात आल्याने मृत्यूची संख्या अधिक दिसून येत आहे. मागील 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.