Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! दिवसभरात 2933 नवीन रुग्ण, 92 जणांचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यातील परिस्थिती सुधारत असताना कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने लोक संक्रमीत होऊ लागले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट होताना पहायला मिळत होते. मात्र आज रुग्णांच्या संख्येसोबत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने धोका वाढला आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 2933 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 92 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2933 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 393 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2485 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 90 हजार 421 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 21 हजार 938 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 92 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 55 रुग्ण शहरातील आहेत. तर 37 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4554 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 3033 तर हद्दीबाहेरील 1521 रुग्णांचा समावेश आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हद्दीबाहेरील 2193 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर शहरातील 291 रुग्णांवर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

आज मृत्यू झालेले रुग्ण काळेवाडी, पिंपळे गुरव, पिंपरी, चिंचवड, थेरगाव, मोशी, त्रिवेणीनगर, संत तुकारामनगर, खराळवाडी, दिघी, कासारवाडी, वाकड, तळवडे, चिखली, साईनाथनगर, निगडी, दापोडी, विशालनगर, आकुर्डी, सांगवी, वडमुखवाडी, नेहरुनगर, खडकी, तळेगाव, कोंढवा, येरंडवने, आळंदी, देहुगाव, सिंहगड रोड, पुणे, बालेवाडी, शिक्रापुर, मंदोशी, वरवंडी, शिरुर, जुन्नर, अहमदनगर, नांदेड, मोरवाड, भुगाव, विश्रांतवाडी, कोथरुड, जुन्नर, मोहमदवाडी, चाकण, तुळापूर येथील रहिवाशी आहेत.