Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2102 नवीन रुग्ण, 2363 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संखेत मोठ्या प्रमाण वाढ झाली. परंतु मागिल काही दिवसांपासून घट होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्णांच्या संख्ये देखील मागील काही दिवसांपासून घट होत आहे. मात्र रुग्ण संख्या कमी होत असताना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र त्याचवेळी 95 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2102 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 17 हजार 495 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2363 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्य़ंत 1 लाख 92 हजार 784 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 21 हजार 619 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 95 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 59 रुग्ण शहरातील आहेत. तर 36 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4649 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 3092 तर हद्दीबाहेरील 1557 रुग्णांचा समावेश आहे. शहरामध्ये हद्दीबाहेरील 2204 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर शहरातील 293 रुग्णांवर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

आज मृत्यू झालेले रुग्ण भोसरी, काळेवाडी, चिंचवड, तळवडे, पिंपळे गुरव, रहाटणी, पिंपरी, मोशी, यमुनानगर, थेरगाव, दापोडी, दिघी, सांगवी, नेहरुनगर, किवळे, चिखली, पुनावणे, चऱ्होली, वाकड, वडमुखवाडी, आकुर्डी, देहुरोड, जुन्नर, आळंदी, वाघोली, हाडपसर, विश्रांतवाडी, पुणे, लोहगाव, सासवड, खडकी, उस्मानाबाद, चाकण, पिंपरी पेंढार, जांभे, येथील रहिवाशी आहेत.

पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,आधी मृत झालेल्या केसेस आज कळवण्यात आल्याने मृत्यूची संख्या अधिक दिसून येत आहे. मागील 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.