Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1805 नवीन रुग्ण, 2408 जणांचा डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  एप्रिल महिन्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली. रुग्ण वाढत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन रुग्णसंख्येत घट होत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, मृतांची संख्या कमी होत नसल्याने चिंता कायम आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात कोरोनाचे 1805 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 63 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 1805 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 19 हजार 300 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2408 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 95 हजार 192 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 20 हजार 976 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 63 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 40 रुग्ण शहरातील आहेत. तर 23 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4712 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 3132 तर हद्दीबाहेरील 1580 रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या 2190 एवढी असून शहरातील 296 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आज मृत्यू झालेले रुग्ण पिंपरी, तळवडे, सांगवी, रहाटणी, दिघी, चिंचवड, निगडी, भोसरी, चिखली, आकुर्डी, काळभोरनगर, कासारवाडी, नखातेवस्ती, काळेवडी, थेरगाव, पिंपळे गुरव, खेड, कोथरुड, वाघोली, वुरुळी कांचन, अहमदनगर, कोंढवा, वारजे, पुणे, चाकण, येलवडी, धनकवडी, खराडी, आळंदी, भिमा कोरेगाव, वारजे, खडकी, सांगली, दौंड, बाणेर, औंध येथील रहिवाशी आहेत.