Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2148 नवीन रुग्ण, 2183 रुग्णांना ‘डिस्चार्ज’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यात सर्वाधित सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. मात्र, मागिल काही दिवसांपासून नवीन रुग्णांची संख्या घटली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंता कायम आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात 2148 नवी रुग्ण सापडले असून 65 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात शहरात 2148 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 448 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2183 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 97 हजार 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 20 हजार 900 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 65 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये 41 रुग्ण शहरातील आहेत. तर 24 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4777 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 3173 तर हद्दीबाहेरील 1604 रुग्णांचा समावेश आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हद्दीबाहेरील 2183 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर शहरातील 296 रुग्णांवर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

आज मृत्यू झालेले रुग्ण थेरगाव, भोसरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी, चिखली, चिंचवड, आकुर्डी, निगडी, रावेत, दापोडी, पिंपरी, नेहरुनगर, दिघी, रावेत, मोशी, आजमेरा, खेड, फलटण, धानोरी, कोथरुड, देहुगाव, जुन्नर, पानोडी, फुलगाव, आळंदी, पुणे, सातारा, चाकण, हिंजवडी, शिरुर येथील रहिवाशी आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आधी मृत्यू झालेल्या केसेस आज कळवण्यात आल्याने मृत्यूची संख्या अधिक दिसून येत आहे. मागील 24 तासात 10 मृत्यू झाला आहे.