Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2106 नवीन रुग्ण, 1943 जणांचा डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.मात्र रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्येत घट झाली होती. तर बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, मागील दोन दिवसांत रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2106 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 68 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 2106 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 26 हजार 072 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1943 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येने आज दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. आजपर्यंत 2 लाख 633 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 22 हजार 181 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 68 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 43 रुग्ण शहरातील आहेत. तर 25 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4912 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 3258 तर हद्दीबाहेरील 1654 रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या 2121 एवढी असून शहरातील 128 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आज मृत्यू झालेले रुग्ण चऱ्होली, पिंपळे सौदागर, पिंपरी, पुर्णानगर, रावेत, रुपीनगर, संत तुकारामनगर, चिखली, वाकड, निगडी, दिघी, विकासनगर, भोसरी, चिंचवड, मोशी, सांगवी, शाहुनगर, मोरवाडी, वाकड, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरव, बोपोडी, हिंजवडी, हडपसर, देहूगाव, मरकळ, कोंढवा, जुन्नर, लोणावळा, पिंपरी पेंढार, वाकडेवाडी, चाकण महाळुंगे, करवेनगर, वानवडी, नारायणगाव, पुणे, जुन्नर, तेगाव, विश्रांतवाडी, कोथरुड, खेड येथील रहिवाशी आहेत. पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आधी मृत्यू झालेल्या केसेस आज कळवण्यात आल्याने मृत्यूची संख्या अधिक वाटत आहे. गेल्या 24 तासात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.