Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1547 नवीन रुग्ण, 1999 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  एप्रिल महिन्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली. रुग्ण वाढत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन रुग्णसंख्येत घट होत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, मृतांची संख्या कमी होत नसल्याने चिंता कायम आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात कोरोनाचे 1547 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 69 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 1547 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 32 हजार 904 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1999 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 8 हजार 987 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 20 हजार 494 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 69 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 45 रुग्ण शहरातील आहेत. तर 24 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5174 इतकी झाली आहे. यामध्ये शहरातील 3423 तर हद्दीबाहेरील 1751 रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या 1900 एवढी असून शहरातील 155 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आज मृत्यू झालेले रुग्ण तळवडे, पिंपरी, मोशी, पिंपळे सौदागर, चिखली, वाकड, चिंचवड, दापोडी, दिघी, वल्लभनगर, सांगवी, बोपखेल, पिंपळे गुरव, निगडी, भोसरी,चऱ्होली, आकुर्डी, संत तुकारामनगर, बिजलीनगर, सोलापूर, धायरी, श्रीगोंदा, खेड, लोहगाव, पुणे, दौंड, जुन्नर, वाघोली, देहुरोड, वारजे, सांगली, हाडपसर, मोहमदवाडी, हिंजवडी, पाषाण, उंडरी, बोपोडी, मिरज, पंढरपूर येथील रहिवाशी आहेत. पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आधी मृत्यू झालेल्या केसेस आज कळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.