Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 2093 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. एप्रिलमध्ये रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने यंत्रणेवर मोठा ताण पडला होता. मात्र, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले. मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवडमध्ये 605 नवी रुग्ण आढळून आहेत. तर 57 मृत्यूंची नोंद झाली असून गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 605 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 43 हजार 185 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2093 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 24 हजार 419 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 15 हजार 033 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 57 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 40 रुग्ण शहरातील आहेत. तर 17 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 3733 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये रविवार आणि सोमवार या दिवशी कोरोना विरोधी लसींचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी शहरातील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती.