Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 762 नवीन रुग्ण, 1980 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अशरश: थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 1 जुन पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम होताना दिसत आहे. मागिल काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत घट झाली असून मृतांची संख्या देखील कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 762 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 58 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 762 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 43 हजार 947 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1980 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 26 हजार 399 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 13 हजार 773 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 58 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 42 रुग्ण शहरातील आहेत. तर 16 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 3775 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये 61 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात येत आहे. आज दिवसभरात 5869 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 4 लाख 70 हजार 942 जणांना लस देण्यात आली आहे.