Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 421 नवीन रुग्ण, 894 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने शहरामध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. याशिवाय रुग्ण बरे होत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 421 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 421 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 51 हजार 478 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 894 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 42 हजार 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 4 हजार 680 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

…म्हणून बहिणीनं सख्ख्या भावासोबत केलं लग्न

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 28 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 18 रुग्ण शहरातील आहेत.
तर 10 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4118 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.3) शहरामध्ये 57 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे.
आज दिवसभरात 3170 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 5 लाख 04 हजार 097 जणांना लस देण्यात आली आहे.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे