Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 224 नवीन रुग्ण, 233 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. शहरात आजही नविन रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही  वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (pimpri chinchwad) 224 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 25 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 641 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार,
आज दिवसभरात शहरात 224 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 51 हजार 967 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 233 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 44 हजार 809 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 3 हजार 007 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Pune Crime News : गंभीर गुन्हे करणार्‍या ओंकार गुंजाळ अन् त्याच्या 4 साथीदारांवर मोक्का

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 25 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यामध्ये 16 रुग्ण शहरातील आहेत. तर 09 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे Coronavirus शहरातील 4151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी (दि.5) शहरामध्ये 57 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे.
आज दिवसभरात 2228 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 5 लाख 8 हजार 580 जणांना लस देण्यात आली आहे.

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या

 

दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

25 वर्षांच्या हलीमाने एकाचवेळी दिला होता 9 मुलांना जन्म; एक महिन्यानंतर ‘ही’ आहे स्थिती

Sleeping without Clothes : उन्हाळ्यात कपड्यांशिवाय झोपल्यानं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात