Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण, 335 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. शहरात आजही नविन रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad City) 221 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,891 नवीन रुग्ण, तर 16,577 जणांना डिस्चार्ज

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार,
आज दिवसभरात शहरात 221 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 52 हजार 664 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 335 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 45 हजार 540 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus) मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 2 हजार 940 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Pune News | शहरी गरिब योजनेच्या ‘लाभार्थीं’च्या नावे शहरात मालमत्ता, 622 कार्डधारकांना नोटीस; शहरातील ‘त्या’ 11 मोठ्या रुग्णालयात यापुढे शहरी गरिब योजना नाही !

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 11 रुग्ण शहरातील आहेत.
तर 08 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे (Coronavirus) शहरातील 4184 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (दि.8) शहरामध्ये 62 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे.
आज दिवसभरात 4098 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 5 लाख 15 हजार 362 जणांना लस देण्यात आली आहे.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत