Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात आज 300 जण ‘कोरोना’मुक्त, 314 नवीन रुग्णांचे निदान

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवेगळ्या भागात 314 नवीन कोरोना बाधित (Coronavirus) रुग्णांची गेल्या 24 तासात नोंद झाली आहे. तर रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या 300 रुग्णांची दुसरी कोरोना (Coronavirus) चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

आज शहरातील 9 आणि पालिका हद्दीबाहेरील 9 अशा एकूण 18 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
तर गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरात 4 हजार 193 जणांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे.
शहरात आतापर्यंत 2 लाख 52 हजार 978 लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
त्यापैकी 2 लाख 45 हजार 840 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या 2 हजार 945 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
यापैकी 1 हजार 176 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर 1 हजार 769 सक्रीय रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बुधवारी (दि.9) शहरामध्ये 61 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे.
आज दिवसभरात 3690 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 5 लाख 19 हजार 052 जणांना लस देण्यात आली आहे.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण