Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 555 जण ‘कोरोना’मुक्त, 314 नवीन रुग्णांची नोंद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad शहरामध्ये कोरोना Coronavirus बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. शहरात गेल्या 24 तासात 251 नवीन कोरोना Coronavirus बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर रुग्णालयात Hospital उपचार सुरु असलेल्या 03 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, 555 रुग्णांची कोरोनाची दुसरी टेस्ट Corona Second Test निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आले आहे. शहरामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.

आज शहरातील 7 आणि पालिका हद्दीबाहेरील 8 अशा एकूण 15 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
तर गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत शहरात 4 हजार 210 जणांचा कोरोनामुळे Coronavirus मृत्यू झाला आहे.
शहरात आतापर्यंत 2 लाख 53 हजार 473 लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
त्यापैकी 2 लाख 46 हजार 734 इतके रुग्ण Patient कोरोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या 2 हजार 529 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
यापैकी 1 हजार 701 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.
तर 828 सक्रीय रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी (दि.11) शहरामध्ये 60 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या Pimpri Chinchwad Municipality वतीने तर दोन खासगी केंद्रावर लसीकरण Vaccination करण्यात आले आहे.
आज दिवसभरात 2948 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 5 लाख 24 हजार 811 जणांना लस देण्यात आली आहे.

READ ALSO THIS :

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 367 रुग्ण ‘कोरोना’मुक्त