Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 199 नवीन रुग्ण, 224 जणांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. शहरात आजही नविन रुग्णांची (New patient) संख्या दोनशेच्या आत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad City) 199 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 07 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department of Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 199 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 54 हजार 289 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 224 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 48 हजार 539 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1 हजार 520 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु आहेत.

Kondhwa Police Pune | माजी पोलीस महासंचालकांच्या घरासह 2 ठिकाणी हात ‘साफ’ करून 1,34,95,641रुपयाची चोरी करणाऱ्यांना हरियानातून अटक

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 07 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 04 रुग्ण शहरातील आहेत.
तर 03 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे (Coronavirus) शहरातील 4230 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी (दि.15) शहरामध्ये 61 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
आज दिवसभरात 2804 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 5 लाख 31 हजार 548 जणांना लस देण्यात आली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : pimpri chinchwad coronavirus news updates

हे देखील वाचा

Pune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल

Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam । राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा ? अजित पवार म्हणाले..

Ramdas Athawale | ‘मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही’, आठवलेंचा नाना पटोलेंना सल्ला