Pimpri Chinchwad Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात डिस्चार्ज रुग्णांपेक्षा ‘कोरोना’चे नवीन रुग्ण अधिक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) गेल्या 24 तासात 212 नवीन कोरोना बाधित रुग्णांची (New corona patient) नोंद झाली आहे. तर 202 कोरोना बाधित रुग्णांना (Pimpri Chinchwad Coronavirus ) डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसांनंतर कमी आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. pimpri chinchwad coronavirus news updates

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 212 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 54 हजार 738 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 202 रुग्ण कोरोनामुक्त (Recover) झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 49 हजार 217 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1 हजार 282 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Bribery Case | 50 हजाराच्या लाच प्रकरणी मुख्य विधी सल्लागार मंजूषा इधाटे यांना जामीन मंजूर

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यामध्ये 04 रुग्ण शहरातील आहेत.
तर 06 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4239 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी (दि.17) शहरामध्ये 61 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. गुरुवारी दिवसभरात 2152 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 5 लाख 35 हजार 679 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : pimpri chinchwad coronavirus news updates

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime News | धक्कादायक ! 75 वर्षांच्या सासऱ्याने लोखंडी सुरीने सुनेवर केले सपासप वार; पुणे जिल्ह्यातील घटना

Post Office मध्ये FD करणार्‍यांनी लक्ष द्यावे, आकर्षक व्याजासह मिळतील अनेक मोठे फायदे, येथे जाणून घ्या