Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 172 नवीन रुग्ण, 253 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad City) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. रुग्ण बरे होत असल्याने सक्रिय (Active patient) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास हजारांवर आली असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 172 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 172 नवीन रुग्ण (New patient) आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील (PCMC City) कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 54 हजार 910 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 253 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 49 हजार 470 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1 हजार 195 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यामध्ये 06 रुग्ण शहरातील (City) आहेत. तर 05 रुग्ण हद्दीबाहेरील (Out of City) आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4245 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी (दि.18) शहरामध्ये 61 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
शुक्रवारी दिवसभरात 3409 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 5 लाख 39 हजार 088 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : pimpri chinchwad coronavirus news updates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

pune municipal corporation | पहिल्या तिमाहीत महापालिकेचे उत्पन्न घटले; महागाई व वेतनामुळे खर्च वाढला