Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या नवीन रुग्णांमध्ये वाढ, 414 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad City) मागील काही दिवसांपासू कोरोनाच्या (Coronavirus) नवीन रुग्ण संख्येत घट झाली होती. परंतु आज कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. दोनशेच्या आत आलेली रुग्ण संख्या पुन्हा चारशेच्या वर पोहचली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. रुग्ण बरे होत असल्याने सक्रिय (Active patient) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 406 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 406 नवीन रुग्ण (New patient) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील (PCMC City) कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 57 हजार 103 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 414 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 51 हजार 531 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 296 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 02 रुग्ण शहरातील (City) आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील (Out of City) आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (दि.27) शहरामध्ये 23 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. आज दिवसभरात 6109 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 6 लाख 17 हजार 279 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Titel :- pimpri chinchwad coronavirus news updates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर