Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 228 नवीन रुग्ण, 210 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad City) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या (Corona) नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 228 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 05 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 03 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. pimpri chinchwad coronavirus news updates

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 228 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 60 हजार 451 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 210 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 54 हजार 790 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 357 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Pune Corona News | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 320 नवीन रुग्ण, 302 रुग्णांना डिस्चार्ज

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात 05 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4304 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी (दि.10) शहरामध्ये 76 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 14 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 21177 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 7 लाख 74 हजार 118 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : pimpri chinchwad coronavirus news updates

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Vinayak Raut | ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’

Social and Political Agitation Cases | सामाजिक, राजकीय आंदोलनातील डिसेंबर 2019 पुर्वेचे खटले मागे घेण्याचा सरकारचा निर्णय, समिती स्थापन