Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 81 नवीन रुग्ण, 148 जणांना डिस्चार्ज

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 81 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 148 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (मंगळवार) शहरामध्ये कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 81 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 99 हजार 029 वर पोहचली आहे. आज 148 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 95 हजार 771 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेला रुग्णांमध्ये चिंचवड, पिंपरी, कात्रज, जुन्नर येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 2538 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1789 शहरातील तर 749 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 628 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 80 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 69 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.