Coronavirus : दिलासादयक ! गेल्या 24 तासात पिंपरी-चिंचवडमध्ये 1151 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णवाढीचा दर गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. शहरातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला असताना शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. गेल्या 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड शहरात 1151 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरात 59 हजार 968 रुग्ण बरे झाले आहेत.

पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शहरामध्ये 749 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 70 हजार 172 एवढी झाली आहे. आज आढळून आलेले सर्व रुग्ण शहरातील आहे. शहराबाहेरील 1149 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 476 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 11 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 8 रुग्ण शहरातील आहेत तर 3 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 1507 वर पोहचला आहे. यामध्ये 1142 रुग्ण शहरातील तर 365 रुग्ण शहराबाहेरील आहेत.

सध्या शहरामध्ये 5375 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये चिखली, पिंपरी, निगडी, काळेवाडी, चिंचवड, भोसरी, पिंपळे निलख, विश्रांतवाडी, धनकवडी, जुन्नर येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.