Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 166 नवीन रुग्ण, 119 जणांना डिस्चार्ज

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 166 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 119 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शुक्रवार) शहरामध्ये पाच कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 166 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 99 हजार 411 वर पोहचली आहे. आज 119 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 96 हजार 070 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोन रुग्ण महापालिका हद्दीतील तर तीन रुग्ण हद्दीबाहेरील आहे. मृत्यू झालेले रुग्ण चिंचवड, सांगवी, नगर, जुन्नर, आर्वी (पुणे) येथील आहेत. आतापर्यंत शहरात 2545 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1792 शहरातील तर 753 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 665 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 95 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 83 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.