Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 102 नवीन रुग्ण, 161 जणांना डिस्चार्ज

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 102 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 161 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (मंगळवार) शहरामध्ये चार कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.

गेल्या 24 तासात शहरामध्ये 104 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 111 वर पोहचली आहे. आज 161 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 97 हजार 515 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये पालिका हद्दीबाहेरील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेला रुग्ण चिंबळी येथील रहिवासी आहेत. आतापर्यंत शहरात 2593 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1825 शहरातील तर 768 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 620 रुग्ण ॲक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 104 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 106 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.